नाशिकरोडला पावसाने झोडपले : वीज गायब 

अनेक ठिकाणी होर्डिंग चे नुकसान झाडे पडली
नाशिकरोड : प्रतिनिधी
 नाशिकरोड आणि जेलरोड भागात रविवारी (दि.9)  सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. यात अनेक ठिकाणी झाडे उनमळून पडली. परिणामी वीज पुरवठा खंडित झाल्याचे चित्र होते. तर  जेलरोड परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात लावलेल्या होर्डिंग कोसळून त्यांचे नुकसान झाले.
उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या नारायण बापू नगर पोलीस चौकी चे छप्पर कोसळून चौकी समोर लावलेल्या गाड्याचे नुकसान झाले. रविवारी दिवस भर उकडत असतांना संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याना सुरवात झाली. व त्या नंतर पावसाची जोरदार सुरवात झाली. जोरदार वरा, पाऊस व प्रचंड विजेच्या कडकडा मुळे नाशिकरोड मधील हॉकर्स, भाजीपाला विक्रते व फळविक्रते यांची प्रचंड धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे बिटको चौकातील एम डी हॉटेल समोरचे झाड अचानक कोसळले. यात काही दुचाकी चे नुकसान झाले. तर बिटको उड्डाणपूल खालील पवन हॉटेल समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले शुभेच्या चे होर्डिंग कोसळले त्यात मात्र काही नुकसान झाले नाही. शिवाजी महाराज पुतळ्या समोरील एक होर्डिंगचे थोडे फार नुकसान झाले. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले होते. रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य दिसून येत होते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून लहानसान अपघात घडत होते.वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाण ची वीज पुरवठा खंडित झाला मात्र एक ते दोन तासानंतर महावितरण ने तो टप्याटप्याने सुरू केला. रात्री नंतर वातावरण मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *