जागतिक पुस्तक दिन

 जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागचे कारण माहित आहे का ? हा दिवस का आणि कधीपासून साजरा करण्यात आहे ?
चलातर मग जाणून घेऊया इतिहास आणि पुस्तक दिन संदर्भात काही रंजक गोष्टी…
 जगातील अनेक प्रमुख लेखकांचा मृत्यू किंवा जन्म हा 23 एप्रिल या दिवाशी झाला आहे. त्यांचा स्मरणार्थ हा दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विल्यम शेक्सपियरचा मृत्यू तसेच मॅन्युएल मेजिया वलेजोचा जन्म हा 23 एप्रिल रोजीच झाला होता. त्यानुसार हा दिवस साजरा केला जातो.
 पुस्तकाला माणसाचा मित्र मानले जाते. पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत त्यांना वाचावच लागतं. पुस्तक वाचन ही एक चांगली सवय आहे. वाचनाने आपल्या ज्ञानात वाढ होते. अशा या पुस्तकांसंदर्भात आज महत्त्वाचा दिवस आहे. त्यानुसार लोकांमध्ये पुस्तक वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून जगात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो.
पुस्तक दिन साजरा करण्यास 1995 साली सुरुवात झाली. युनेस्कोने 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन तसेच कॉपीराइट दिन साजरा करण्याची घोषणा केली. युनेस्कोच्या एका सभेत हा निर्णय घेण्यात आला होता. जगभरातील लेखकांना सन्मान देण्याचा या मागचा उद्देश आहे.
जगात वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तक दिन साजरा केला जातो. काही ठिकाणी पुस्तके वाटण्यात येतात, काही ठिकाणी वाचन स्पर्धा घेण्यात येते तर काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयात लेखन स्पर्धा घेतली जाते. साक्षरता वाढत लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा त्या मागचा उद्देश आहे.
सध्याच्या आधुनिक युगात लोकांमधील पुस्तक वाचनाची गोडी कमी होत आहे. इंटरनेटवर पाहिजे असेल ती माहिती सहज उपलब्ध होत असल्याने लोक पुस्तकांपासून दूर जात आहे. आजच्या तुलनेत पूर्वी माहिती मिळविण्यासाठी पुस्तक हेच एकमेव प्रभावी साधन होते. त्यामुळे लोक तासंतास पुस्तक वाचत होते. बहुतांश लोकांच्या घरात पुस्तकांचा संग्रह असायचा. मात्र आता परिस्थिती  बदलली असून पुस्तकांची जागा आता मोबाईल आणि इतर गॅझेटने घेतली आहे. ही परिस्थिती दूर सारत लोकांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जात आहे. त्यानुसार म्हणजेच ‘तुम्ही वाचक आहात का?’ ही २०२२ या वर्षाच्या जागतिक दिनाची थीम होती. जागतिक पुस्तक दिन 2023 ची थीम हा ‘तुमचा’ जागतिक पुस्तक दिन बनवत आहे.
जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो?
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हा पुस्तकांचा आणि वाचनाचा आनंद वाढवण्यासाठी एक उत्सव आहे. प्रत्येक वर्षी, 23 एप्रिल रोजी, पुस्तकांची व्याप्ती ओळखण्यासाठी जगभरात उत्सव साजरे केले जातात – भूतकाळ आणि भविष्यातील दुवा, पिढ्या आणि संस्कृतींमधील पूल म्हणून देखील या दिवसाचे महत्त्व आहे.
पुस्तके हीच आपली मित्र आहेत असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत. तेव्हा मित्रांनो, आजच्या दिवसापासून चांगली पुस्तके वाचनास सुरुवात करूया… ज्ञानाच्या या महासागरात डुबकी घेऊन, आपले जीवन अधिक ज्ञान संपन्न व सुखकर करूया याच शुभेच्छा…
– विश्वास देवराम चुंभळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *