डॉ स्नेहल मगर
सौन्दर्यशास्त्र व केस विकार तज्ज्ञ
सोरायसिस हा विकार त्वचा विकार असला तरीही संक्रमक नाही त्यामुळे सोरायसिस चा त्रास असलेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे याची लागण होत नाही त्यामुळे कोणतेही गैरसमज करून घेऊ नये.
सोरायसिस होण्याची कारणे: सोरायसिस नेमका कशामुळे होतो याचे अद्यापही ठोस कारण माहिती झालेले नाही परंतु सिस्टीम संबंधित काही कारणे तसेच जेनेटिक कारणे यासाठी जबाबदार असतात सोरायसिस हा एक ऑटो इम्युन संबंधित विकार आहे.
यामध्ये आपल्या शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशी मधील टी सेल्स या त्वचेच्या पेशीवर हमला करत असतात सामान्यपणे ती सेलचे कार्य हे शरीराचे इन्फेक्शन पासून तसेच विविध शरीरातील बॅक्टेरिया पासून रक्षण करणे हे असते मात्र चुकून त्या T पेशी जेव्हा त्वचेच्या पेशींवर अटॅक करू लागतात तेव्हा त्वचेचे स्तर लवकर लवकर निर्माण होऊ लागतात त्या ठिकाणी त्वचा जाड होते लालसर चट्टे येतात त्वचेतून पापुद्रेत किंवा खवले निघत असतात.
सोरायसिस चे निदान: रुग्णांमध्ये असलेली लक्षणे तसेच शारीरिक तपासणी करून त्वचारोग चिकित्सक तसेच त्वचारोग तज्ञ सोरायसिसचे निदान करू शकतात याशिवाय अधिक स्पष्ट होण्यासाठी स्किन बायोप्सी या निदानाचा उपयोग करता येतो यामध्ये त्वचेचा एक छोटासा नमुना घेऊन त्याची लॅब मध्ये तपासणी होते.
सोरायसिस ट्रिगर: सोरायसिस ट्रिगर म्हणजे असे अनेक घटक ज्यामुळे सोरायसिस चा त्रास अधिक वाढू लागतो विशेषतः थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी झाल्याने सोरायसिस चा त्रास अधिक जाणवलेला वाढतो तसेच काही घटक जसे मानसिक ताण तणाव सिगारेट धूम्रपान मद्यपान यांसारखी व्यसने उच्च र क्तदाबावरील औषधे, मलेरिया वरील औषधे वेदनाशामक औषधे यासारख्या काही औषधांचे परिणाम सोरायसिस चा त्रास वाढवतात म्हणून याला सोरायसिस ट्रिगर म्हणजेच सोरायसिस वाढवणारे घटक असे म्हटले जाते
सोरायसिस वरील उपचार सोरायसिस पूर्णपणे बरा होण्यासाठी कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाही परंतु उपचारामुळे त्वचेवर होणारी सूज खाज खाज बापूद्रे इत्यादी कमी करण्यासाठी तसेच त्वचेच्या पेशींची वाढ कमी करण्यासाठी व त्रास आटोक्यात राहण्यात मदत होते सोरायसिस व त्वचेवर लावण्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारचे औषधी क्रीम्स आणि मलम दिले जातात तसेच काही वेळा पोटातून घेण्यासाठी काही गोळ्या व औषधे दिली जातात तसेच काही वेळा लाईट थेरपीचाही अवलंब केला जातो अल्ट्राव्हायोलेट करणे सूर्यकिरणे युवीए युवी बी या प्रकारातील लाईटचा थेरपीद्वारे सोरायसिस वर सुरक्षित आणि प्रभावी उपचार केले जातात
सोरायसिस कायमचा बरा होतो का? हा आपल्याला रुग्णाला तसेच त्याच्या नातेवाईकांना नेहमी असणारा प्रश्न आहे त्यामुळे कोणतेही औषध उपचारांनी हा त्वचा विका 100% बरा करता येत नाही परंतु उपचारामुळे त्याची लक्षणे व त्रास आटोक्यात राहण्यास पूर्णपणे मदत होते.
सोरायसिस मध्ये पथ्य आणि अपथ्य. पथ्य: या रुग्णांनी फायबर्स ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जीवनसत्वे खनिजे यांनी परिपूर्ण असणारे आहार पदार्थ खाल्ले पाहिजे यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या ताजी फळे कडधान्य सर्व प्रकारची धान्य सोयाबीन जवस अक्रोड मासे कमी फॅट असणारे दुग्धजन्य पदार्थ तसेच गाजर बीट भोपळा काकडी मोड आलेली कडधान्य असे पदार्थ आहारात जरूर समाविष्ट करावे. अपथ्य – या रुग्णांनी चरबी वाढवणारे पदार्थ तेलकट पदार्थ जास्त तिखट व खारट पदार्थ तसेच चरबीयुक्त लाल मांस जास्त फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ टोमॅटो तसेच gluten असणारे पदार्थ टाळावे
सोरायसिसच्या रुग्णांनी घ्यायची काळजी मानसिक ताण घेऊ नये तणावापासून दूर राहण्यासाठी आवडणारे छंद जोपासावे ध्यान धारणा इत्यादी करावे त्वचेवर इजा किंवा जखम होणार नाही याची काळजी घ्यावी
स्मोकिंग अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे सहसा सुती सैल आणि मऊ तसेच त्वचेला सुसह्य होतील अशी वस्त्रे वापरावीत अंघोळीसाठी सौम्य साबण वापरावा तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे परस्पर घेणे टाळावे या सर्व उपचारांनी आपणास सोरायसिस पासून त्रास होण्यापासून बचाव करता येईल.
ReplyForward
|
I am continuously invstigating online for tips that can benefit me. Thx!