मनमाड (आमिन शेख):- मनमाड बाजार समितीवर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आली असुन
१८ पैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता आणली आहे.या निवडणुकीत शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्यासह माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड विजयी झाले आहेत.तर विद्यमान आमदार सुहास कांदे गटाला अवघ्या 3 जागावर समाधान मानावे लागले आहे.
नाशिक जिल्ह्यासह सम्पूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज जाहीर झाला असुन यात भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असुन 18 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाले तर विद्यमान आमदार सुहास कांदे यांना अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे दहशत पैसे खोटे गुन्हे या सगळ्याना लाथाडत मतदारांनी महाविकास आघाडीला कल दिला असुन आमदार सुहास कांदे यांच्या हातातून मनमाड बाजार समिती गेली आहे.
सोसायटी गट
1) किशोर लहाणे
152(कपबशी)
2) पुंजा राम आहेर – 147(छत्री)
3)विठ्ठल आहेर -145(छत्री)
4) दीपक गोगड – 149(छत्री)
5) कैलास भाबड-143(छत्री)
6) आनंदा मार्कन्ड -141(छत्री)
7) अप्पा कुनगर -139(कपबशी)
महिला राखीव
1)संगीता रमेश कराड – 159(छत्री)
2)चंद्रकला पाटील – 142(छत्री)
सोसायटी इ.मा.व गट
1)संजय सयाजी पवार -154(छत्री)
सोसायटी वी.ज .भ .ज
1)गणेश धात्रक -163(छत्री)
ग्रामपंचायत गट सर्वसाधारण
1)सुभाष उगले -105(छत्री)
2) गंगाधर बिडगर -114(छत्री)
ग्रामपंचायत आर्थिक दुबल गट
1)योगेश कदम -105(छत्री)
ग्रामपंचायत अनु .जाती गट
1)दशरथ लहिरे -107(कपबशी)
व्यापारी गट
1)किसनलाला बंब- 70(अपक्ष)
2)रुपेशकुमार ललवाणी- 76(अपक्ष)
हमाल मापारी
1) मधुकर उगले-74(अपक्ष)
महाविकास आघाडी- 12
शिवसेना शिंदे गट – 3
अपक्ष – 3
एकूण – 18
पाहा व्हीडिओ