तंटामुक्त सावानासाठी सर्वस्व पणास लावणार-प्रा.दिलीप फडके
नाशिक: प्रतिनिधी लोकहितवादी,न्यायमूर्ती रानडे,स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज,वसंत कानेटकर यांच्या सहवासाचा समर्थ वारसा लाभलेल्या आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय,नाशिक(सावाना)ला यशाचे आणखी उंच शिखर गाठून देण्यासाठी आम्ही सर्व सर्वस्व पणास लावू आणि तंटामुक्त वाचनालय करू,असे प्रतिपादन ग्रंथालयभूषण पॅनलचे नेते व अध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.दिलीप फडके यांनी केले.
सावानाच्या 2022 ते 2027 पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रंथालय पॅनलच्या प्रचाराचा नारळ गुरुवारी सायंकाळी तिडके कॉलनीतील ऋग्वेद मंगल कार्यालयानजीक असलेल्या विनायक नयनतारा सिटीवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत फुटला त्यावेळी उपस्थित सभासद आणि हितचिंतकांना संबोधित करतांना प्रा.फडके बोलत होते.8 मे रोजी ही निवडणूक होत आहे.
व्यासपीठावर ज्येष्ठ कवी नरेश महाजन,डॉ.आर्चीस नेर्लीकर, विजय साने, उपाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.विक्रांत जाधव व प्रा.डॉ.सुनील कुटे,बाळासाहेब पाठक,नरेश महाजन,आर्चीस नेर्लीकर,प्रभाकर धात्रक,प्रेरणा बेळे,सुधाकर बडगुजर, प्रताप मेहरोलिया,गिरीश पालवे आदी होते.
वाचन संस्कृतीपासून दूर गेलेल्या लोकांना पुन्हा वाचनाची गोडी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व सदस्य संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल.वाचनालयाला दुर्मिळ ग्रंथसंपदेचा वारसा लाभला असून त्याचे जतन केले जाईल तसेच त्यात मोठ्याप्रमाणात भर घालण्यासाठी पावले उचलली जातील.वाचनालय तुमच्या दारी ही संकल्पना राबविली जाईल आणि वाचनालयाच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाईल,असेही फडके आपल्या भाषणात म्हणाले.संस्था तंटामुक्त करण्यासाठी कुणाशीही चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचेही प्रा.फडके यांनी नमूद केले.
यावेळी विजय साने,नरेश महाजन, सुधाकर बडगुजर,व्ही.एन.नाईक संस्थेचे प्रभाकर धात्रक, बाळासाहेब पाठक,प्रशांत कापसे, प्रेस कामगार नेते जयंत गाडेकर,कल्पना शिंपी, गिरीश पालवे,ज्येष्ठ कवी
नरेश महाजन यांची भाषणे झाली.यावेळी सर्वानी संस्थेला वादापासून मुक्त करा, वाचनालयाचा वारसा जोपासावा आदी सूचना केल्या.सावाना हा नाशिकचा कणा आहे आणि त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल,असेही वक्त्यांनी यावेळी सांगितले.रमेश कडलग,प्रशांत कापसे,दीपक जाधव, सुरेश रांका,सुरेश बागूल आदींनी यावेळी पॅनलला समर्थन जाहीर केले.
कार्यक्रमास स्थायी समिती माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, रमेश गायधनी, नाएसोचे चंद्रकांत वाड,वास्तू विशारद रवींद्र अमृतकर,समर्थ बँकेचे चेअरमन नरेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष मनोज गोडसे, चेंबरचेउपाध्यक्ष सुधाकर देशमुख,राजा वर्टी,राजेंद्र निकम, नामकोच्या रजनीताई जातेगावकर,अरुण मुनशेट्टीवर,रवींद्र झोपे,सचिन महाजन, ज्येष्ठ पत्रकार योगेश कमोद,प्रा.संगीता काकळीज, विख्यात सनदी लेखापाल सी.जे.गुजराथी,विनोद जाजू,पवन भगूरकर,आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ,सचिव ललित बूब,कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, राजेंद्र जाधव,उद्योग आघाडीचे सतीश कोठारी,सुवर्णकार समाजाचे राजेंद्र वडनेरे, वंदना गडकरी, नामदेव शिंपी समाजाचे अतुल मानकर,कांतीलाल कोठारी, ॲड.जयदीप वैशंपायन,हेमंत मालपाणी,वेदशास्त्र संपन्न शांताराम भानोसे,अखिल ब्राह्माण संघाचे सतीश करजगीकर, दिलीप अहिरे,निशांत जाधव,ज्ञानेश देशपांडे,गिरीश नातू,प्रदीप पस्टील,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आयमाचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी केले.जयंत जातेगावकर, संजय करंजकर,देवदत्त जोशी, ॲड.अभिजित बगदे आदींनी कार्यक्रम यशस्वीत्यासाठी परिश्रम घेतले.