सोशल मीडियाचा असाही विधायक उपयोग रुपाली जाधव, पूनम अहिरराव यांच्यामुळे गरजू महिलेला मिळाली शिलाई मशीन,

सोशल मीडियाचा असाही विधायक उपयोग
रुपाली जाधव, पूनम अहिरराव यांच्यामुळे गरजू महिलेला मिळाली शिलाई मशीन
नाशिक: सोशल मीडियामुळे अनेकदा कटू प्रसंग ओढावतात, पण सोशल मीडिया चा वापर समाजातील गरजू साठी देखील करता येऊ शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला, सटाणा येथील रुपाली जाधव या समाज कार्यात नेहमीच अग्रस्थानी असतात, वृद्धाश्रम असो वा सामाजिक ,धार्मिक कार्य, रुपालिताई जाधव नेहमीच स्वतः धावून जातात, सटाणा येथील दोन महिलांना कुटुंबाच्या उदर निर्वाह साठी शिलाई मशीनची गरज होती, त्यामुळे रुपाली जाधव आणि पूनम अहिरराव यांनी सोशल मीडियावर शिलाई मशीन साठी आवाहन केले होते, त्यांच्या या आवाहनाला शहरातील
समाजातील दानशूर व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळाला,
सौ.शुभांगी चंदात्रे आणि श्रीमती निर्मला गायकवाड ह्यांनी आपल्या कडे असलेली चांगल्या अवस्थेतील जुनी मशीन गरजुंना दान दिली .सोशल मिडीयाचा असाही महत्वाचा उपयोग ह्या निमित्ताने दिसून आला .प्रत्येकाला काही तरी खारीचा वाटा उचलून समाज कार्य करावयाचे असते त्या साठी आम्ही निमित्त मात्र ठरलो .आम्ही मैत्रिणींनी सुरु केलेला हा समाज कार्याचा यज्ञ असाच सुरु रहावा .दिव्याने दिवा पेटविला असता दीपमाळ होते तसेच दानाच्या ह्या साखळीने समाज कार्य होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *