मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा निवड समितीने फेटाळून लावला. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला पाहिजे, या मतावर कार्यकर्ते आणि निवड समितीचे पदाधिकारीठाम आहेत, दरम्यान, राजीनामा मागे घ्यावा म्हणून राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमलं आहे, एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला,