मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा मागे घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि नेते मंडळींचा वाढता दबाव लक्षात घेऊन शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली, यानंतर वाय बी चव्हाण सेंटरबाहेर उपस्तिथ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, यापत्रकार परिषदेला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, प्रतिभा ताई पवार, रोहित पवार उपस्थित होते,
दरम्यान, सकाळी झालेल्या समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता, त्यानंतर सर्व समिती सदस्यांनी सिल्वर ओक वर जात शरद पवार यांना समिती सदस्यांनी केलेल्या ठरावाची प्रत दिली होती,
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले,
2 मे रोजी लोक माझे सांगाती या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.. या निर्णयामुळे तीव्र भावना उमटल्या होत्या. पदाधिकारी आणि जनतेत तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या,सर्वांनी मी राजीनामा मागे घ्यावा म्हणून विििनंती केली होती, या भावनाांचा माझ्याकडून अनादर होणे शक्य नाही, त्यामुळे मी राजीनामा मागे घेत असल्याचे ते म्हणाले,