लासलगावच्या पहिल्या महिला सरपंच कुसुमताई होळकर यांचे निधन

लासलगाव: प्रतिनिधी

लासलगावच्या प्रथम महिला सरपंच कुसुमताई सीताराम पाटील होळकर याचं आज दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले. स्व.सीताराम पाटील होळकर यांच्या सोबतीने तितक्याच ताकदीने लासलगाव पंचक्रोशीत राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुसुमताई यांच्या निधनाने एक सक्षम महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांनी लासलगाव ग्रामपंचायत सरपंच व नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य पदही भूषविले. त्यांच्या निधनाने होळकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *