त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
वैतरणा आळवंडी धरणात (वैतरणा )आज सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास अरुण जाधव रा नाशिक अंदाजे वय 20 वर्ष हा युवक बुडाल्याची घटना घडली, आज सकाळी अंघोळ करण्यासाठी तो धरणात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, त्याचा शोध घेतला जात असून काही स्थानिक पट्टीचे पोहणारे लोक शोध घेत आहेत.