येवल्यात पंचायत समितीचे दोन
अधिकारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
येवला पंचायत समितीमधील दोन अधिकाऱ्यांना 1000 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले,पंचायत समिती कार्यक्रम अधिकारी
गंभीर लहू सपकाळे आणि विस्तार अधिकारी आनंदा यादव अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार याची गाय गोठा प्रकरणाची फाईल या अधिकाऱ्यांनी अडून ठेवली होती. एक फाईलचे 500 याप्रमाणे तीन फायलीचे 1500 रुपये मागितले होते, 1 हजार रुपयांवर तडजोड झाली, याबाबत तक्रार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक मीरा आदमाने कॉन्स्टेबल एकनाथ बाविस्कर चंद्रशेखर मोरे प्रवीण महाजन संतोष गांगुर्डे परशुराम जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली