या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल ! 

 

 

संजय राऊत यांचे ट्वीट

 

 

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)

राज्य सरकार विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल”, असे ट्विट व फेसबुक पोस्ट करत खा. संजय राऊत यांनी आपला लढा सुरूच रहाणार असल्याचे अधोरेखीत केले आहे.

खा. संजय राऊत म्हणतात, “नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय?

सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन” बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्या पर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील.असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला..मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *