पुन्हा भुर्रर्र, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली
नवीदिल्ली: महाराष्ट्रातील बैलगाडा आणि तामिळनाडूत होणाऱ्या जलीकट्टू या खेळांवरील बंदी सुप्रीम कोर्टाने आज उठवली, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे, न्यायमूर्ती जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस,ऋषिकेश रॉय, सी, टी, रविकुमार यांच्या घटना पीठाने हा निर्णय दिला, या निर्णयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे