इगतपुरी : प्रतिनिधी
कपडे धुण्यासाठी खाणीवर गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना खंबाळे शिवारात घडली.
खंबाळे येथील विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खाणीच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी एक विवाहिता गेली होती. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या एकाने या महिलेला जवळच असलेल्या खड्डयात घेऊन जात बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला. ही घटना समजताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे असलेल्या एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.यात एकूण तीन जण होते. दोनजण घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून, पुढील तपास घोटी पोलीस करीत आहेत.