सेनेच्या नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा ?

संयोजक म्हणून आ.फरांदेची नियुक्ती, शिंदे गटात अस्वस्था

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपने तयारी सुरु केल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. या चर्चाना आता अधिक बळ मिळाले आहे. या  मतदारसंघाकरिता भाजपने आमदार देवयानी फरांदे यांची संयोजक म्हणून नियुक्ती केल्याने शिंदे गटाला धक्का बसला असून कमालीची अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. नाशिकच नव्हेतर संपूर्ण राज्यासाठी अशा नियुक्त्या भाजपने केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे जेथे शिंदे गटाचे खासदार आहेत. तेथेही संयोजक देण्यात आल्याने पुढच्या काही दिवसात यावरुन दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
…….

भाजप-सेना युतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला तर दिंडोरी मतदारसंघ भाजपला असे सूत्र ठरले होते. मात्र भाजपची नजर आता नाशिक लोकसभा मतदारसंघावर पडली की, असे वाटत आहे.  सध्या त्यादुष्टीनेच त्यांची तयारी सुरु असल्याचे बोलले जात होते. आ. फरांदे यांची संयोजक म्हणून नियुक्ती केल्याने निवडणुकीच्या दुष्टीने हालचाली वाढताना दिसत आहे. यातून भाजप स्वत:चे कॅम्पेन करण्याच्च्या स्थितीत असल्याचे बोलले जातेय.  हेमंत गोडसे शिंदे गटाचे खासदार असून ठाकरेंचा हात सोडत शिंदे सोबत गेले. यापूर्वी गोडसे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सलग दुसऱ्यांदा संसदेवर निवडून गेलेेत. आता उमेद्वारी करण्याची त्यांची तीसरी टर्म असणार आहे. मात्र राज्यातील राजकारणातील उलथापालथ व कालवाकालवीचा परिणाम नाशिक लोकसभा मतदारसंघावर होण्याची स्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष व चिन्ह मिळाले आहे. खा. गोड्से शिंदे समवेत असल्याने या जागेवर भाजप दावा करणार नाही, असे शिंदे गटाचे म्हणने आहे. मात्र असे असले तरी भाजपने संयोजकाची नियुक्ती केल्याने शिंदे गटाला धक्का दिला आहे.  नाशिकची जागा भाजपला हवी असल्याची कुजबूज गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. लोकसभेची जागा लढवण्यासाठी शहर भाजपातील काहींनी आतापासून तयारीला लागले आहे. वरिष्ठांची यास मूक संमती असल्यानेच काही जनांकडून आपन लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे नागरिकांना दाखवले जात आहे.  नाशिकची जागा शिंदे गटाक्कडून मिळेल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. भाजप नाशिकची जागा ताणून धरण्याची शक्यता आहे. यातून दोन्ही पक्षात तणाव उदभवण्याची शक्यता आहे. यापूर्वी सेनेकडून नाशिकची जागा घेणे शक्य नव्हते. परंतु सध्या बदलेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा भाजप घेउ पाहत आहे, का अशीही चर्चा होत आहे. म्हणून नाशिक लोकसभेची जागा प्रतिष्ठेची होणार आहे.

भाजपचे दबावतंत्र ?

नुकत्याच एका संस्थेकडून एक सर्वे करण्यात आला. ज्यात नागरिकांची मते जाणून घेतली असता त्यात भाजपला 33 टक्के पसंती मिळाली. तर शिंदेंच्या शिवसेनेला अवघे 5 टक्केच पसंती असल्याचे समोर आले आहे. यासह इतर गोष्टींचा आधार घेउन भाजप शिंदे गटावर जागा मिळ्वण्यासाठी दबाव टाकू शकतो.
………..
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार ?

लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटांच्या उमेद्वारांना भाजप कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. असा दावा वारंवार विरोधकाकडून करण्यात येतो आहे. असे शिंदे गट करणार का, स्वत:चे राजकीय अस्तित्व दाखवायचे असेल तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष चिन्हावर उमेद्वार द्यावेच लागणार आहे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *