नाशिक: पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या महापालिका शिक्षण अधिकारी यांना अटक केल्यानंतर पथकाने त्यांच्या घराची झडती घेतलीअसता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले, सुनीता धनगर यांनी जमवलेली माया पाहून पथक अचंबित झाले,
एसीबीने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत अटक केली होती. यानंतर त्यांच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असता त्यात ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने, २ फ्लॅट आणि एक प्लॉट असे घबाड हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली, पालिका शिक्षण अधिकारी असल्याने त्यांनी एवढे घबाड जमा केल्याने पथक ही अचबीत झाले,
नाशिक महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी या दोघांना एसीबीने लाच घेताना अटक केली होती, ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना रंगे हाथ पकडले होते,
तक्रारदार हे मुख्याध्यापक असून त्यांना एक प्रकरणात निलंबित करण्यात आलेले होते, कामावर रुजू करून घेण्यासाठी लिपिक जोशी यांनी पाच हजार तर धनगर यांनी 45 हजार रुपये घेत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड पथकाच्या हाती लागले,