नागरिकांची उडाली धांदल, कुठे झाडे कोलमडली तर कुठे उडाले छप्पर
सिन्नर:जून महिना नुकतंच सुरू झालाय. जून उजाडला तसं मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सिन्नर तालुक्यातही मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. रविवार आठवडा बाजार असल्याने सिन्नर शहरात शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाची धांदल उडालेली बघायला मिळाली.वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोलमडली, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र सकाळी उन्हाचे चटके लागत होते आणि दुपारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.यात तालुक्यातील कोमलवाडी येथे व्यायामशाळेचे छत उडाले तर मेंढी – सोमठणे रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दातली येथे झाडाची फांदी पडल्याने विजेच्या तारा तुटून विजपुरवठा खंडित झाला होता