दिक्षी गावातील शेतकऱ्यांना मिळाले मजबुत शिवार रस्ते 

 सरपंच डॉ योगेश्वर चौधरी  यांचे स्वखर्चातुन शिवार रस्त्याची कामे मार्गी
दिक्षी -सोमनाथ चौधरी
शेतकऱ्यांच्या  शेतात जाणाऱ्या शिवार  रस्त्यांना विविध अडचणीमुळे शासनाचा  निधी उपलब्ध होत नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवार रस्त्याच्या दुरुस्ती साठी पाणंद योजना राबविण्यात येत असली तरी तिच्या जाचक अटी मुळे सदर योजना राबविण्यात विविध अडचणी येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्ते वर्षोनुवर्षे दुर्लक्षित होऊन  मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना व  अनेक अडचणी निर्माण होतात शेतकऱ्यांची  शिवार रस्त्याची सततची मागणी बघता निफाड तालुक्यातील दिक्षी गावात महिन्यांपूर्वी ग्रामपालिकेत सत्तातर झाले यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील ओझर येथील उषा हॉस्पिटलचे संचालक  प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ.योगेश्वर चौधरी यांची थेट लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली
ह्या उचशिक्षित तरुण  सरपंचाने  कामकाजास सुरुवात केली त्यांच्या लक्षात आले की इतर समस्या प्रमाणे शिवारातील रस्ते ही एक महत्वाची समस्या आहे .शासन दरबारी प्रयत्न पण केले पण शिवार रस्त्यांना निधी उपलब्ध होणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर सरपंच चौधरी व त्यांच्या सदस्यांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी काढून गावातील शिवार रस्त्यांची कामे सुरू केली आहे. आणि गावातील सर्वच शिवार रस्ते पावसाळा सुरू होण्याच्या आत दुरुस्ती करून घेतले . एकिकडे राजकारणात फोफावत चाललेला भ्रष्ट्राचार व दुसरीकडे सर्व राज्याने आदर्श घ्यावा असे विकास कामे व दूर दृष्टी असलेली दिक्षीची ग्रामपालिकेचे सरपंच. उपसरपंच सदस्य लोकवर्गणीतून करीत असलेली कामे वाखाणण्याजोगी आहे. दिक्षी गावाची चर्चा आता सर्वत्र पसरत असून असेच शिक्षित तरुणांनी राजकारण यावे असे सर्वांना वाटत आहे.
तरुण व उच्चशिक्षित उमेदवार म्हणून गावाने मला फार मोठ्या अपेक्षेने व मताधिक्याने निवडून दिले, या पाच वर्षांमध्ये गावाचे रंगरूप बदलण्याचे माझे स्वप्न आहे. आपण भारताला कृषिप्रधान देश म्हणतो पण शेतीसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर कडे आपण किती लक्ष देतो हे देखील तितकेच महत्वाचे आहे. मोठं मोठे हायवे, बुलेट ट्रेन हे सर्व झाले पाहिजे याबाबत कुठलेही दुमत असल्याचे कारण नाही पण त्यासोबतच शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्याचा शेतमाल बाजारपेठेत आणता येईल एवढ्या प्रतीचे तरी रस्ते व्हायलाच हवे. शासनाच्या अनेक योजनांचा यासाठी आम्ही उपयोग करून घेतच आहोत पण त्यासोबतच आम्ही काही कामे लोकवर्गणीतूनही करीत आहोत. शेतकरी जगला तरच सर्व जगतील असे माझे स्पष्ट मत आहे.
           -डॉ.योगेश्वर चौधरी
           सरपंच ग्रामपालिका दिक्षी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *