विद्युत खांब आणि विजेच्या साहित्याबाबत काळजी घ्या

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचे आवाहन
नाशिक : पालिका
नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत खांब आणि विजेच्या साहित्या जवळ न जाता काळजी घ्यावी. असे आहावन पालिकेने केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका इमारती, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरिता दिवाबत्तीची यंत्रणा उभारणेत आली आहे. सदर प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेप्रमाणे करण्यात येते.
तरी नागरीकांना या जाहीर प्रकटनाद्वारे कळविण्यात येत आहे की, महानगरपालिका इमारत व दिवाबत्तीचे खांबामधुन मनपाकडून दिवाबत्तीसाठी ३ फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. तरी येत्या पावसाळ्यात नागरीकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब व यंत्रणेची छेडछाड करु नये. खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करु नये अथवा विनापरवाना विद्युत पुरवठा घेऊ नये. जनावरे विद्युत दिव्यांच्या खांबाला बांधु नयेत. जंक्शन बॉक्स वर पाय ठेवून खांबावर चढू नये. कपडे वाळविण्याकरिता तारा पोलला बांधु नयेत. बांधकामामध्ये पोल घेऊ नये. पोलला फ्लेक्स / होडिंग बांधू नये तसेच पोलच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारची केबल / तारा खांबावरुन ओढू नये. अश्या प्रकारच्या कृत्यामुळे संबंधित नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. अश्या प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हानी झाल्यास नाशिक महानगरपालिका अश्या दुर्दैवी घटनेस जबाबदार राहणार नाही याची सर्व संबधित नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी विनंती मनपा विद्युत यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *