राष्ट्रवादी च्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये भाकरी फिरवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मध्यतरी शरद पवार यांचे राजीनामा नाट्य रंगले होते, त्यावर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला, आज राष्ट्रवादी च्या पक्षाच्य बैठकीत राष्ट्रवादी कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केल्याने शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली असल्याचे बोलले जात आहे,