राष्ट्रवादीने केला हा दिन साजरा

नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवसेनेतील शिंदे गटाने केलेल्या बंडाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मंगळवारी पक्ष कार्यालयासमोर गद्दार दिन साजरा केला. खोक्याच्या प्रतिकृती हातात घेत “५० खोके एकदम ओके” अशा घोषणा देत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार आंदोलन केले. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगिता पाटील आहेर, संजय खैरनार, विष्णुपंत म्हैसधुणे, गौरव गोवर्धने, समीना मेमन यांची प्रमुख उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी याच दिवशी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सूरत गाठली. मग गोवा, गुवाहाटी येथून परत येत सरकार स्थापन केलं. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाले होते.
या राजकीय बंडाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात होत आहे. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा करण्यात आल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, राजाराम धनवटे, जीवन रायते, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ, नदीम शेख, मुरलीधर भामरे, राजेंद्र शेळके, सागर लामखेडे, संतोष जगताप, गौतम पगारे, राजेश भोसले, दीपक वाघ, नाना पवार, सुनिल अहिरे, पूजा आहेर, डॉ.संदीप चव्हाण, मुकेश शेवाळे, जय कोतवाल, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, लता नागरे, संगीता पाटील, रुपाली तायडे, मंगल मोरे, पुष्पा वाघ, अपर्णा खोत, अपेक्षा आहिरे, संजिवनी जाधव, कविता कट्यारे, भारती पगारे, पुष्पा राठोड, रविंद्र शिंदे, रितेश केदारे, अक्षय परदेशी, कृष्णा काळे, सागर मोटकरी, अशोक पवार, आसाराम शिंदे, निधी जाधव, तन्मय शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *