अज्ञात वाहनाच्या धडकेत भारतीय सैन्य दलातील जवानचा मृत्यू
लासलगाव प्रतिनिधी
अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात भारतीय सैन्य दलातील जवानचा जागीच मृत्यू झाल्याची घटना
आंबेगाव-वेळापूर शिवारात बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील सावरगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान लांस नाईक सागर नागनाथ मुळे वय 30 हे सुटीवर आलेले होते.बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आंबेगाव – वेळापूर शिवार लासलगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत त्यांच्या बुलेट मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या जवानाचा जागीच मृत्यू झाला.अज्ञात वाहन व चालक फरार आहे.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.सदर जवान यांचा अंत्यविधी सावरगाव ता.येवला येथे शासकीय इतेमात होणार असल्याची माहिती मिळून आली आहे.