नाशिक: शहरातील सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे, ठेकेदाराने आश्वासन पूर्ण न केल्याने वाहक पहाटेपासून पुन्हा संपावर गेले आहेत, त्यामुळे आज सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावली नाही, बस बंद असल्याने प्रवाशी, नोकरदार, विदयार्थी यांचे हाल झाले, रिक्षाला त्यामुळे प्रतिसाद लाभत असल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी जादा पैसे आकारले, सर्व वाहक डेपोत तपोवन येथे जमा झाले,पाचव्यांदा संप झाला आहे, अधिकारी वर्ग तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे.