अन्यायकारक भाडेवाढ रद्द करा
नागरिकांचे म्हाडाला निवेदन
नाशिक : वार्ताहर
म्हाडाचा नाशिक विभागाकडून म्हाडा वसाहतीतील सदनिका धारकांसाठी असलेल्या भुई भाड्यात करण्यात आलेली अवाजवी आणि अन्यायकारक भाडेवाढ करावी, या मागणीचे निवेदन म्हाडा कॉलनीतील रहिवाशांतर्फे म्हाडाचे नाशिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी.डी.कासार आणि अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना सादर करण्यात आले
सुरवातीस २००-५०० रूपये भुई भाड्याच्या तुलनेने सुधारित भाडे अन्यायकारक म्हणजे १०,००० ते १५,००० इतके करण्यात आले आहे. नुतनीकरणाचा वेळी गेल्या २० ते ३० वर्षांचे भुईभाडे ह्या पद्धतीने वसूल करण्यात येत आहे.
सातपूरला मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या ह्या लोकांसाठी ही भुईभाडे वाढ अन्यायकारक अशीच आहे.
सदरील भुईभाडे वाढ रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे म्हाडा वसाहतीमधील घरे ही फ्री होल्ड करावीत याबाबतचे निवेदन म्हाडा वसाहतीमधील घरमालक व सर्वपक्षीय नेत्यांतर्फे देण्यात आले आहे .
त्याचप्रमाणे झालेली अन्यायकारक भाडेवाढ आणि त्याचा होणार प्रभाव ह्याबद्दल सविस्तर चर्चा करत सदर भाडेवाढ रद्द करण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आलीआहे.
निवेदनाखाली रामनाथ शिंदे, बन्सीलाल रायते, दीपक लोंढे, जीवन रायते,हर्षल आहेर,लोकेश कटारिया,मनोज अहिरे,धीरज शेळके,राहुल साळुंखे, प्रमोद लोहाडे,संतोष बर्वे,बापू सावकार, सूरज धूत,चेतन खैरनार,राजेश खताळे,सुयोग मोरे,शाम खुर्दळ आदींचा सह्या आहेत.