नाशिक : वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी शहराध्यक्ष ॲड.गौरव गोवर्धने यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.उपमुख्यमंत्री अजित पवार व ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण,महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आ. विक्रम काळे आदी उपस्थित होते.
ॲड.गौरव गोवर्धने यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विविध पदांवर सक्रीय कार्य केले आहे.कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.युवक व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. तसेच पक्षवाढीसाठी त्यांनी केलेले काम व समर्पित भावना लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्षपद तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.उत्तर महाराष्ट्र विभागातील ५ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात येईल.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच व लोकसभा, विधानसभा निवडणुकांत युवकांना जास्त उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि आपल्या कामांद्वारे श्रेष्ठींचा विश्वास आपण सार्थ ठरवू असा विश्वास गोवर्धने यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला.