येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील मुखेड मधील एका युवकाचा प्रेम प्रकरणातुन खून करण्यात आला आहे. प्रतिक सुनील आहेर असे खुन झालेल्या तरूणाचे नांव आहे. या प्रकरणी पाेलिसांचा मुखेड गांवात कडक बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वसंत केशव जाधव, संदीप वसंत जाधव, सुनील वसंत जाधव, निखिल संदिप जाधव आदी संशयिताना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पाेलिस करीत आहेत.