मुंबई: प्रख्यात मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले. त्या 81 वर्षाच्याया होत्या, लावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी रमेश देव यांच्या सोबत अनेक भूमिका साकारल्या. जगाच्या पाठीवर, जानकी, आनंद याबरोबरच अनेक मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांना अल्झायमर चा त्रास होता. त्यांचे पती रमेश देव यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. शालीन आणि देखनी अभिनेत्री असलेल्या सीमा देव यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते.
मंत्री भुजबळ यांनी वाहिली श्रद्धांजली
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! सरस्वतीचंद्र, आनंद, ड्रीम गर्ल, जगाच्या पाठीवर, सुवासिनी अशा हिंदी-मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक सोज्ज्वळ चेहरा हरपला आहे. देव कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
छगन भुजबळ
मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य