बबनराव घोलप ठाकरे गटाला देणार धक्का?
नाशिक: संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले माजीमंत्री बबनराव घोलप हे ठाकरे गटाला धक्का देण्याची शक्यता आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघात एकीकडे भानुदास वाकचौरे हे पुन्हा ठाकरे गटात सहभागी झाले असतानाच घोलप हे शिर्डी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, त्यातच उद्धव ठाकरे यांनी घोलप यांना संपर्क प्रमुख पदावरून हटऊन त्यांच्या जागी दुसरा संपर्क प्रमुख नियुक्त केला, त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे उपनेते पदचा राजीनामा पाठवल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात प्रारंभी फारसा फरक पडला नाही, मात्र त्यानंतर खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आमदार नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले, आता बबन राव घोलप काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.