नाशिक जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज  अलर्ट

 

नाशिक जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज  अलर्ट

अतिमुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात   शनिवार दि.16 व  रविवार 17 सप्टेंबर  रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असुन मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिक जिल्हयासह शहरात पावसाचे मागील आठवड्यात  दमदार कमबॅक  झाले. दोन दिवस झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली.  मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर शहरात काल शुक्रवार  सायंकाळच्या सुमारास  पावसाने हजेरी लावली होती.  त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र होते.यंदा पावसाळ्यातले  दोन महिने उलटून गेले तरी पावसाने ओढ दिल्याने पाणीकपातीचे संकट नाशिककरांवर ओढवण्याची शक्यता होती.   मात्र मागील आठवड्यात  झालेल्या पावसाने जिल्हावासियांना दिलासा मिळाला असला तरी पिकांसाठी  पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला आहे.

गणरायाचे स्वागत पावसात

येत्या दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज  वर्तवण्यात  आला असल्याने  लाडक्या बाप्पाचे स्वागत पावसात करावे लागणार आहे. त्यामुळे  गणेश भक्तांकडून बाप्पांच्या स्वागताची आधीच तयारी करण्यात येत आहेत.

असा आहे अंदाज

16 व 17 सप्टेंबर रोजी  ऑरेंज  अलर्ट असुन मुसळधार व अतिमुसळधार  पावसाचा अंदाज  आहे .तर 18 व 19 सप्टेंबर रोजी  ग्रीन अलर्ट असुन    मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्याला मिळणार दिलासा
नाशिक जिल्ह्यात  मागील आठवड्यात मुसळधार  पाऊस झाल्याने धरणे ओव्हर फ्लो झाली होती.   त्यामुळे गंगापुर ,नांदुरभधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास  धरणातून   पुन्हा पाण्याच  विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याने  जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *