लासलगाव:समीर पठाण
केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात खरीप हंगाम २०२३ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.त्यासाठी केंद्र शासनाचे सुचनांप्रमाणे राज्याच्या सध्या वापरण्यात येत असलेल्या ई-पीक पाहणी मोबईल ॲप मध्ये अत्यावश्यक बाबींचा समावेश करून राज्याचे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप कस्टमाइज करण्यात आलेले आहे व या कस्टमाइज डिजीटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲप वापरुन खरीप हंगाम २०२३ मध्ये ऑगस्ट पासून डिजीटल क्रॉप सर्व्हे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.
डिजिटल क्रॉप सव्हें पायलट प्रकल्प शेतकरी स्तरवरील पीक पहाणीचा कालावधी दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ (४५ दिवस) असा होता त्या कालावधीत १० दिवस मुदतवाढ देऊन दिनांक २५ सप्टेंबर २०२३ अशी अंतीम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये डिजीटल क्रॉप सर्व्हे पायलट मोबाइल ॲप द्वारे ई-पीक पाहणी नोंदवावी असे आवाहन एन.के. सुधांशु जमाबंदी आयुक्त व संचालक,भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे