सातपूर : वार्ताहर
पोलिस स्टेशन हद्ीतील बेलगाव परिसरातील लॉन्समधील 9 हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी करवतीने कापून चोरून नेल्याची घटना 22 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी विनोद सुमंत पारेख (रा. पारेख फार्म बेलगाव ढगा सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात सुमारे नऊ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.