नामकोची निवडणूक जाहीर
24 डिसेंबर ला मतदान, 25 ला मतमोजणी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असलेल्या नामकोच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून एकूण 21 जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान तर 25 ला मतमोजणी होणार आहे, निवडणूक अधिकारी म्हणून फयाज मुलानी हे काम पाहणार आहेत. उमेदवारी अर्ज विक्रीला 24 नोव्हेंबर पासून सुरवात होणार आहे. 1 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकृती करता येणार आहे. 4 डिसेंबर ला छाननी होणार असून, 5 ला यादी प्रसिध्द होईल, 11 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येईल, 12 ला निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवार यांना चिन्ह वाटप होईल, त्यानंतर 24 ला मतदान आणि 25 ला मतमोजणी होणार आहे. सर्वसाधारण18, अनुसूचित जाती 1, महिला राखीव 2 अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.