नाशिक: प्रतिनिधी
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना आज सकाळी भोपाळ येथे ताब्यात घेण्यात आले, मालेगाव येथील रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र ते न फेडल्याने हा आकडा 30 कोटीच्या घरात पोचला आहे, या प्रकरणात त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे, त्यामुळे याप्रकरणी रमजान पुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, याशिवाय
हिरे कुटुंबातील सदस्यांनी शासनाची फसवणूक करून शिक्षक भरती केल्याचा देखील आरोप आहे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील यांनी कोणतीही खतीरजमा न करता प्रस्ताव मंजूर केल्याने किरण कुवर यांनी यापूर्वी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे, तथापि रेणुका सूतगिरणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे हिरे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा जामीन नुकताच फेटाळला होता, त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होतं, मालेगाव पोलिस त्यांचा शोध घेत असताना ते भोपाळ येथे असल्याचे समजले, तेथे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.