मुंबई:
वानखेडेच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग दहावा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात फायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे.
भारताने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. न्यूझीलंड समोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिल. मात्र न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर सर्वबाद झाला. भारताने 70 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीने 117 धावांची खेळी खेळत शतक पुर्ण करत विराट कामगिरी केली.या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक गडी बाद केले. भारताकडून शुबमन गिलने 89धावा, तर श्रेयस अय्यरने 106 धावा केल्या. तर मोहम्मद शम्मी सात गडी बाद करत मॅन ऑफ द मॅच ठरला