प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

डॉ शंकर बोऱ्हाडे यांचे निधन
नाशिक: प्रसिद्ध साहित्यिक, लेखक प्रा डॉ शंकर बोऱ्हाडे यांचे आज उपचारा दरम्यान गुरुजी हॉस्पिटल येथे निधन झाले.
नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले आहे .
डॉ. शंकर बोऱ्हाडे हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे डॉ बोहाडे हे साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *