सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न
मनमाड
प्रतिनिधी :- शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची आज मनमाडला महाप्रबोधन यात्रे अंतर्गत सभा होती या सभेला जाताना आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला सुषमा अंधारे यांच्या सभेला मोठा हायहोलटेज आला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या प्राध्यापक सुषमा अंधारे यांची आज मनमाडला महाप्रबोधन यात्रा अंतर्गत सभा होती या सभेला आमदार सुहास कांदे यांच्या गटांतर्फे मोठा विरोध करण्यात आला यासाठी रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यासह इतर काही लोकांनी पोलिसांना पत्र देऊन सभा रद्द करण्यात यावी असे सांगितले यानंतर वातावरण पेटले व सुषमा अंधारे यांच्या तर्फे फेसबुक लाईव्ह करून मी मनमाडला येणार आणि सभा घेणार हे सांगितले त्यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या शहरप्रमुख यांनी फेसबुक लाईव्ह करून विरोध केला सभा सुरू होण्यापूर्वी सभेस्थळी जाण्यासाठी सुषमा अंधारे यांची गाडी अडविण्यात आली.
सभेचे पोस्टर पालिकेने उतरवले…!
सुषमा अंधारे यांची सभा मनमाडला होणार आहे याच्या पालिकेच्या वतीने परवानगी घेण्यात आल्या मात्र या सभेला तहसीलदार यांनी परवानगी नाकारली यामुळे पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी यांनी गावातील सर्व लावण्यात आलेले पोस्टर उतरवण्यात आले.