भुरट्या चोरांचा शेतमजुरांच्या स्मार्टफोनवरच डल्ला

भुरट्या चोरांचा शेतमजुरांच्या स्मार्टफोनवरच डल्ला

लासलगाव समीर पठाण

निफाड पूर्व भागात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला असून द्राक्षे बाग कामगारांच्या चार स्मार्टफोनवरच वरच डल्ला मारला आहे.त्यामुळे भुरट्या चोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये लक्ष्मण गोपाळ बोरसे रा.रानविहिर ता.पेठ, ह.मु.देवगाव फाटा यांनी फिर्याद दिली असून मीव येवाज किसन बात्रे व माझ्या गावाकडचे अनेक मजुर नितिन खैरनार रा.मुखेड यांचे मालकीच्या वाकद शिवारातील शेतात प्लास्टिकच्या ताडपत्रीचे पाल बांधुन राहत असून द्राक्षे बागेचे काम करून पोट भरतो.आम्ही रात्री जेवण करुन झोपी गेलो. आम्ही सकाळी उठल्यावर माझा स्मार्टफोन उशाशी आढळून आला नाही,माझे मजुर मित्र मंगेश गोपाळ बोरसे, हरिदास सिताराम बात्रे,बत्तीबाई आंबादास किलबिले यांनी ही खात्री केली असता त्यांचे ही स्मार्टफोन मिळुन आले नाही.याबाबत भारतीय दंड संहिता ३७९ नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पो.हवा.औदुंबर मुरडनर हे करीत आहेत.

 

लासलगाव परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक तात्पुरत्या निवारा शेड अथवा पाल करून राहतात त्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल व्यवस्थित ठेवावे,परिसरात कुणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने लासलगाव पोलीस स्टेशनला कळवावे.

राहुल वाघ
सहा.पो.निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *