लासलगावी पुन्हा कांद्याचे लिलाव बंद

लासलगावी पुन्हा कांद्याचे लिलाव बंद

लासलगाव:समीर पठाण

केंद्र सरकारने जाहीर केलेली कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ शेतकरी छावा संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत यांचे आमरण उपोषण सुरु आहे.मात्र सरकारकडून या उपोषणाची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने गोरख संत यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी
संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी तातडीने उठवण्यात यावी या मागणीसाठी लासलगाव बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वार समोर दोन तास ठिय्या आंदोलन करून कांद्याचे लिलाव बंद पाडले

दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी प्रश्र्नि आणि राज्य सरकारने कांदा अनुदानाची उर्वरित रक्कम बाबत दोन दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास निफाड तहसील कार्यालयाच्या दालनात कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करतील असा इशारा करण गायकर यांनी दिल्यानंतर बंद मागे घेण्यात आला व गोरख संत यांचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आज सोमवारी कांद्याला जास्तीतजास्त २३०४ रुपये, सरासरी २१०० रुपये तर कमीतकमी ८०० रुपये भाव मिळाला.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले.त्यानंतर पुन्हा आता शेतकरी आक्रमक झाले आहे.कांदा निर्यातबंदी करताच कांद्याच्या बाजार भावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा करण गायकर यांनी या वेळी दिला आहे.

या वेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती गणेश डोमाडे,बाजार समिती संचालक जयदत्त होळकर,डॉ श्रीकांत आवारे,ललित दरेकर,डी के जगताप,सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह छावा संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *