बंड करायला लावणारे साहित्य अण्णाभाऊंचे त्यांचाच आदर्श घेऊन एकनाथ शिंदेनी बंड केले : सचिन साठे
मनमाड: आमिन शेख
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणावर ज्वलंत विषयावर लिखाण केले गेले आहे.गोरगरीब यांच्यासह अनेक उपेक्षित घटकांवर अण्णाभाऊनी लिखाण केले आहे त्यांचे साहित्य जो वाचतो तो नक्कीच बंड करून उठतो एकनाथ शिंदे यांनीही तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून बंड केला व मुख्यमंत्री झाले असे स्पष्ट मत कॉ अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांनी मनमाड येथे व्यक्त केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी मंचावर नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून कॉ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून स्मारक व्हावे अशी मनमाडच्या मातंग समाजासह इतर समाजाची मागणी होती मात्र आजपर्यंत कोणत्याही राजकारण्यांना जे जमल नाही ते सुहास कांदे यांनी करून दाखवले याबद्दल मी व्यक्तीशा माझ्या कुटुंबाकडुन कांदेचे आभार मानतो असे मत सचिन साठे यांनी बोलून दाखवले यावेळी त्यांनी जगातील 29 देशात अण्णाभाऊचे साहित्य वाचले जाते मात्र भारतात त्यांना अद्यापही उपेक्षितच ठेवले आहे मात्र जो अण्णाभाऊना वाचतो तो बंड करतो असेही साठे यांनी सांगितले मनमाडला लोकशाहीर कॉ अण्णाभाऊ साठें यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी ते अण्णाभाऊ यांच्या सुन सावित्रीमाई साठे यांच्यासह उपस्थित होते.यावेळी त्यांनी काँग्रेस काळात आम्ही खूप वेळा मागणी केली आंदोलन केली मात्र काँग्रेसने लक्ष दिले नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी 25 कोटी रुपये अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार कांदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी मनमाडच्या जनतेच्या मतांमुळे निवडून आलो आहे त्यांनी माझ्या पदरात मतांची भीक टाकली म्हणून मी आमदार झालो त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहे त्यांना दिलेला प्रत्येक शब्द खरा ठरवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि भविष्यात देखील यासाठी कटिबद्ध आहे.यावेळी मंचावर सौ अंजुम कांदे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, राजेंद्र आहिरे, माजी आमदार राजेंद्र देशमुख शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे,राजेंद्र पवार, युवा जिल्हाप्रमुख फरहान खान,अण्णाभाऊ साठे समितीचे मुरलीधर ससाणे, भारतीय जनता पक्षाचे नितीन पांडे,सचिन संघवी,अल्ताफ खान,सुनील हांडगे, योगेश इमले,अमजद पठाण,बाळासाहेब आव्हाड,अंकुश कातकडे, योगेश पाटील,आमिन पटेल,फिरोज शेख, गुरुकुमार निकाळे प्रमोद आहिरे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी समाजरत्न व समाजभूषण म्हणुन माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे यांना मरणोत्तर त्यांच्या पत्नी मुले भाऊ सुन यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तर हे स्मारक व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे मुरलीधर ससाणे,यशवंत बागुल, धनंजय अवचारे यांचाही सन्मान करण्यात आला.तर अण्णाभाऊ यांचे स्मारक बनवून आम्हाला दिलेला शब्द पुर्ण केल्या बद्दल सखल मातंग समाजाच्या वतीने आमदार सुहास कांदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर सकल मातंग समाजाचा मेळावा व सनेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
समाजरत्न आणि समाजभूषण पुरस्कार ही विशिष्ट बाब…!
भारतात कॉ अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या अनेक खालच्या जातीच्या विचारवंतांना लेखक कवींना आजच्या या विकाऊ साहित्यिकानी कधीच मान्य केले नाही परिणामी ते आणि त्यांचा समाज हा उपेक्षित घटक म्हणूनच आजपर्यंत मिरवला गेला मात्र आजच्या या लोकार्पण सोहळ्यात आमदार कांदे यांच्यातर्फे समाजात काम करणाऱ्या घटकांचा अण्णाभाऊ साठे यांच्या वंशाच्या हस्ते समाजरत्न व समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करणे ही विशिष्ट बाब आणि कौतुकास्पद ठरली,