शेती नांगरणी करताना शेतकऱ्यांला आढळले भुयार

शेती नांगरणी करताना शेतकऱ्यांला आढळले भुयार

ग्रामस्थांनी केली भुयार गर्दी, पुरातत्व विभागाला केले पाचारण…

नाशिक: प्रतिनिधी

मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे येथील युवराज राजाराम धिवर यांच्या शेतात ते नांगरटी करत असताना त्यांना अचानकपणे एक खड्डा दिसला तो खड्डा बघुन त्यांनी तात्काळ ग्रामसेवक व तलाठी याना सांगितले त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवाल देतील तेव्हा हे भुयार कसले याबाबत माहिती देण्यात येईल असे तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी सांगितले.

पूर्वी धान्य किंवा इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी आशा प्रकारे भुयार करून त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात येत होत्या.याशिवाय या शेताच्या अगदी बाजूला अंकाई किल्ला आहे कदाचित या किल्यावर जाण्यासाठी येण्यासाठी या भुयराचा वापर केला जात असेल असेही काही जुन्या नागरिकांनी सांगितले आहे मात्र हे काय आहे हे आता पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन सांगतील हेही तितकेच खरे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *