बिबटयाचा संचार वाढल्याने मनसेची मध्य रात्री गस्त
जय भवानी रोड परिसरात नागरिकांमध्ये भीती
नाशिक : प्रतिनिधी
जयभवानीरोड येथे पुन्हा बिबट्या दर्शन होत असल्याने , वनविभागा तर्फे रात्री चे बिबट्यासाठी गस्त होताना दिसत नाही. ट्रॅप कॅमेरा व पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी देखील पूर्ण केली नाही. त्यामुळे मनसेने बिबट्या जेर बंद होण्यासाठी जयभवानी रोड परिसरातील लोणकर मळा येथे रात्री गस्त आंदोलन सुरु केले आहे. वनविभाग सुस्त, बिबट्या फिरे मस्त, करे पाळीव प्राणी फस्त,
आणि मनसे घाले गस्त अशा आशयाचा फलक लावून निषेध केला. यावेळी मनसेचे शहर संघटक ॲड नितीन पंडित, मनविसे प्रदेश सदस्य शशी चौधरी, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुने, शाखा अध्यक्ष आदित्य कुलकर्णी , शाखा उपाध्यक्ष अनुप लोखंडे व स्थानिक नागरिक रीपीयाल सिंग उपस्थित होते. जेथे बिबट्याचा वावर आहे तेथे मनसेने गस्त घालत वनविभागाच्या निष्काळजी पनावर बोट ठेवले. मनसे पदाधिकारी यांनी हातात काठ्या व टॉर्च घेऊन गस्त घातली. नाशिकरोड जयभवानीरोड पाटोळे मळा येथे बिबट्या ने मांजर फस्त केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. फुटेज परिसरात सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळ बळ उडाली व नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. मनसेचे शहर संघटक ॲड नितीन पंडित यांनी सातत्याने मागणी केली आहे. रात्रीचे गस्त वाढवा, ट्रॅप कॅमेरा व पिंजऱ्यांची संख्या वाढवा परंतु वनविभाग या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे करत आहे. सकाळचा मॉर्निंग वॉल्कला जाणाऱ्या व रात्री शत पावली करणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे, संध्याकाळी लहान मुले खेळतांना दिसत नाही व परिसरात दुकानदार लवकरच दुकाने भीतीने बंद करतात, वनविभाग मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहेत का ? असा प्रश्न मनसे ने उपस्थित केला आहे आणि म्हणून वनविभागाला जागे करण्यासाठी रोज रात्री जो पर्यंत वनविभाग गस्त घालत नाही तोपर्यंत मनसे बिबट्यासाठी गस्त आंदोलन करणार असा इशारा मनसे द्वारे देण्यात आला आहे.