नाशिक: प्रतिनिधी
घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र आज देशात बदल होत आहे, सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात आहे, युवकांनी नशेच्या आहारी जाऊ नये, युवकांनी सक्रिय व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, राष्ट्रीय युवा महोत्सवचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते, यावेळी भारतीय संस्कृती चे दर्शन युवा कलाकारांकडून घडवण्यात आले,
मुख्यमंत्र्यांनी केले मोदींचे कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, मोदी है तो मुंमकींन है असे ते म्हणाले,