नारळाच्या झाडावर बिबट्याचा ठिय्या
नांदुर्डीत बिबट्याचा संचार.शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण
निफाड: शहर प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील नांदुर्डी परिसरात बिबट्याने धुमाकूळ केला असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे
सविस्तर माहिती असीकी नांदुर्डी परिसरातील अंबादास निवृत्ती खापरे .कैलास नारायण खापरे यांच्या शेतात शुक्रवार 12 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याचा हा थरार सागर खापरे यांनी अनुभवायला सागर खापरे हे मका शेतीला पाणी देत असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्या हा दबक्या पावलाने येत असताना अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच भुंकण्यास सुरुवात केली त्यावेळी सागर खापरे सावध होऊन मागे वळून पाहिले. पाळीव कुत्र्याच्या आवाजाने बिबट्याने तिथून धूम ठोकली व जवळच असलेल्या नारळाच्या झाडावर जाऊन बसला व परत काही क्षणात तो खाली उतरून जवळच असलेल्या मक्याच्या शेतात पसार झाला या प्रकारामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची गाळण उडाली सागर खापरे यांचे नशीब चांगले म्हणून या संकटातून ते वाचले या घटनेबाबत नांदुर्डी परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे बिबट्याची दवंडी देवुन जागृती केली जात असून देवपूर जुना रस्ता परिसरातही त्याचा वावर काही शेतकऱ्यांना दिसून आला आहे.नांदुर्डी येथे घडलेल्या या चित्त थरारक घटनेमुळे नांदुर्डी परिसरात ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे .परिसरात बिबट्याच्या भीतीने शेतात काम करणे कठीण झाले असून वन विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.