इंदिरानगर: वार्ताहर
पतंग उडवत असताना विजेचा धक्का लागून पाथर्डी फाटा येथे पंधरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी म्हाडा कॉलनी साई राम रो हाऊस येथे पंधरा वर्षाचा मुलगा पतंग उडवत होता. दुपारच्या सुमारास पतंग उडवत असताना त्याला विजेचा धक्का लागला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.