मनमाडनजीक एसटी बस व ट्रॅक्टरचा अपघात

मनमाड नंदुरबार एसटी व ट्रॅक्टरचा अपघात

ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू तर चालक वाहकासह  प्रवाशी जखमी

मनमाड: आमिन शेख

मनमाड आगारतून आज पहाटे निघालेली मनमाड नंदूरबार  बसला मनमाड नजीक असलेल्या चोंडी घाटाजवळ अपघात झाला असुन ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला असुन यात बसचा चालक वाहक यांच्यासोबत काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत नेमका अपघात कसा झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली एसटीचे अधिकारी याबाबत तपास करत आहे.ट्रॅक्टर वरील शेतकरी हा कानडगाव येथील असल्याचे बोलले जात आहे पहाटे  कांदे विकण्यासाठी बाजार समितीत जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *