शिवनई येथे संरक्षण विभागाच्या कंपाउंड लगत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

शिवनई येथे संरक्षण विभागाच्या कंपाउंड लगत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

दिंडोरी (प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिवनई येथील केंद्रीय संरक्षण विभाग प्रकल्पाच्या भिंती लगत तार कंपाउंड मध्ये शिकारी सह अटकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केली आहे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास शिवनई गावालगत असणाऱ्या खंडेराव मंदिरा नजीक केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाच्या भिंतीला असणाऱ्या कंपाउंड मध्ये एक बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन जात असताना अडकला परिसरातील शेतकरी वर्गाने घटनास्थळी जात याबाबत वनविभागाला माहिती दिली
दिंडोरीचे विभागाचे वनपाल अशोक काळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात रेस्क्यू टीम चे मदतीने त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याची सुटका केली. सदर बिबट्या हा तीन वर्षे वयाची मादी असल्याचे वनविभागाने यावेळी सांगितले बिबट्याला अधिक उपचारासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली नाशिक येथील निवारा केंद्रात हलवण्यात आल्याची माहिती वन अधिकारी अधिकारी अशोक काळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *