भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल ; शिवसेना अधिवेशनात उद्धव ठाकरे कडाडले

भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल

शिवसेना अधिवेशनात उद्धव ठाकरे कडाडले

नाशिक:  प्रतिनिधी

अयोध्येतील राम काही भाजपा ची मालमत्ता नाही, लाखो शिवसैनिकांनी बाबरी पाडण्यासाठी आपले रक्त सांडवले आहे, पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलल्या आहेत, त्यांच्या योगदानाचा भाजपला विसर पडला आहे, सर्व श्रेय जर तुम्ही घेणार असाल तर आम्हाला भाजप मुक्त श्रीराम करावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला.

सातपूर येथील हॉटेल डेमोक्र सी येथे आयोजित शिवसेना अधिवेशनात ते बोलत होते, या अधिवेशनाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, खा, संजय राऊत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे ,खा, अरविंद सावंत, प्रियांका चतृवेदी यांच्यासह राज्यभरातील पदादीकरी, नेते उपस्थित आहेत, ठाकरे पुढे म्हणाले, राम की बात झाली आता काम की बात करा, काँग्रेस ने 70 वर्षात काय केले असे तुम्ही विचारता तुम्ही दहा वर्षात काय केले ते सांगा, आज बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न अवघड बनले आहेत, पंतप्रधान लक्षद्वीप ला जाऊन आले, मात्र मणिपूर मध्ये त्यांना जावेसे वाटले नाही, आपली शिवसेना ज्यांनी पळवली त्या वालीचा वध केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, वालीचा वध जसा प्रभू श्रीराम यांनी केला होता तसा शिवसेना पलवणाऱ्याचा करण्याचा निर्धार करा, असा मंत्र ही ठाकरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *