गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक आशितोष गोवारीकरसह या पाच मान्यवरांचा होणार सन्मान
नाशिक :प्रतिनिधी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षानी देण्यात येणार गोदावरी गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांना जाहीर करण्यात आला. त्यात विवेक सावंत (ज्ञान),डाॅ.सुचेता भिडे -चापेकर (नृत्य),सुनंदन लेले (क्रिडा),शामसुदीन तांबोळी (लोकसेवा ),आशुतोष गोवारीकर (चित्रपट),प्रमोद तांबोळी यांना जाहीर झाला आहे..पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह ,सन्मानपत्र व 21 हजार रूपये आहे.या पुरस्काराचे वितरण दि.10 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता गुरूदक्षिणा सभागृह येथे होणार आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन !