भांडण, आमिषातून घर सोडले; चाइल्डलाइनला सापडले!
110 मुलांना हेल्पलाइनमुळे
झाली हेल्प!
झाली हेल्प!
नाशिक ः देवयानी सोनार
घरातून पलायन किंवा फूस लावून नेलेल्या 110 मुलांचा शोध जिल्हा महिला व बालविकास अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनद्वारे लागला आहे. सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2024 या चार महिन्यांत हरविलेली 30 बालके आढळून आली. बालविवाहाची एकूण 19, तसेच बालकामगार 5, बालभिक्षेकरी 5 निवारा, पुनर्वसन, चाइल्ड मिसिंग 5, अपहरण 1, लैंगिक अत्याचार 1, समुपदेशन 7 आदी बालसंगोपन, निवारा, भावनिक आधार व मार्गदर्शन, इएसजी, वैद्यकीय मदत आदी 20 प्रकारच्या केसेसमध्ये एकूण 110 बालकांची नोंद करण्यात आली.
घरातील भांडणे, कडक शिस्तीचे वातावरण किंवा घरात सावत्र आई-वडिलांचा त्रास, स्वतंत्रता, प्रेमप्रकरण, पैशांची लालूच आदी कारणांमुळे मुले घराबाहेर पडतात. घरातून पळून आलेल्या मुलांना हेरून त्यांना भीक मागायला लावणारे काही समाजकंटक नजर ठेवून असतात. अशा मुलांचा वापर ते भीक मागण्यासाठी करतात. अथवा पेन किंवा इतर वस्तू विकायला लावून त्यावर स्वत:ची पोळी भाजून घेतात.
महिला व बालकल्याण समिती अशा मुलांची गरज पाहून त्यांच्या पुनर्वसनासाठी निर्णय घेते. रस्त्यावर किंवा रेल्वे स्टेशन येथे बालके आढळली तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालकल्याण समितीसमोर घेऊन जातात. तात्पुरत्या निवार्याची सोय केली जाते. पालकांचा शोध लागल्यास त्यांच्या ताब्यात दिले जाते. पालकांचा शोध लागेपर्यंत ही बालके संस्थेत दाखल करून घेतात.
त्याशिवाय, पालक मुलांना सांभाळण्यास सक्षम असतील तर ताब्यात दिले जाते. अथवा त्यांची बालगृृहात व्यवस्था केली जाते. पालकांचा शोध न लागल्यास तिथेच त्यांचे शिक्षण आणि इतर सेवा दिल्या जातात. नाशिकमध्ये अशा प्रकारची बालगृहे उपलब्ध आहेत.

1098 या हेल्पलाइनवर करा तक्रार
काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी किंवा अडचणीत सापडलेल्या बालकांसाठी चाइल्ड हेल्पलाइन सतत तत्पर असते. 1098 या मोफत क्रमांकावर बालकांच्या मदतीसाठी फोन येतात. यामध्ये बालकल्याण समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभाग आदी यंत्रणांच्या सहाय्याने बालकांच्या अडचणी सोडवून त्यांना आवश्यक सेवा पुरवली जाते.
–प्रणिता तपकिरे,
प्रकल्प समन्वयक, चाइल्ड हेल्पलाइन, नाशिक
काही मुले पीडित असतील, आपत्तीत सापडलेली असतील किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, अशी मुलेे आढळल्यास, काही मुलांना मदत करायची आहे असे लक्षात आल्यास तर नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइनवर कळवावे. हेल्पलाइनवर कळविल्यानंतर योग्य ती मदत उपलब्ध करून देण्यात येते. रेल्वे स्टेशन, रस्त्यावर सापडलेल्या मुलांना बालकल्याण समितीपुढे हजर केले जाते. त्यानंतर बालकल्याण समितीच्या निर्णयाने पुढील कार्यवाही केली जाते.त्याचवेळी त्यांच्या पालकांचाही शोध घेतला जातो.
– सुनील दुसाने,
जिल्हा महिला बालविकास अधिकारी, नाशिकही आहेत कारणे
घरात कडक शिस्तीचे वातावरण
वारंवार अपमानास्पद वागणूक देणे
महागड्या वस्तू वापरण्यासाठी हट्ट
पैशांचा मोह मोबाइलसाठी हट्ट, सोशल मीडियावरील आभासी जीवनाचा हव्यास
प्रेमप्रकरण गुन्हेगारी पार्श्वभूमी
गरीब परिस्थिती महानगराचे आकर्षण
झटपट श्रीमंत होण्याची इच्छा
परिस्थितीमुळे अनाथ झालेले
सावत्र आई किंवा वडिलांचा जाच