नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांवर इडी, प्राप्तिकर चे छापे
नाशिक: प्रतिनिधी
नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेतील काही बडे ठेकेदार इडी आणि प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत, आज सकाळीच नागपूर येथील इडी आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. पथकाने या बांधकाम व्यावसायिकांच्या घराची झाडा झडती घेण्यात येत आहे, आज सकाळपासूनच पथक तळ ठोकून आहे, ज्यांच्यावर छापे पडले ते सर्व बांधकाम व्यावसायिक नामांकित असून, काहींचा संबंध सरकारमधील सहकाऱ्यांशी असल्याचे बोलले जात आहे.